अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंद्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १ लाख १० हजार ९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने १० ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. तीन ठिकाणी छापे टाकून एकूण सहा आरोपींविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या कारवाईत स्वप्नील भिमराव कवडे आणि फरार अमोल रामदास जाधव यांच्याकडून ६३ हजार १६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत बन्सी गंगाधर काळे आणि फरार अमोल रामदास जाधव यांच्याकडून ३५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल, तर तिसऱ्या कारवाईत अल्ताफ गुलाब मुजावर आणि फरार सलीम दिलावर पिरजादे यांच्याकडून १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
एनटीव्ही न्यूज मराठी | श्रीगोंदा, अहिल्यानगर
