सावनेर शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले, भगवान चांदेकर, संजय टेंभेकर, यशवंत पाटील, गुलाब टेकाडे, संजय राऊत, अतुल राऊत आणि ज्ञानेश्वर गोहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विचार मांडत समाजबांधवांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. प्रा. बाबा टेकाडे यांनी अध्यक्षीय भाषणात अहिल्यादेवींच्या न्यायप्रियतेचा आणि दातृत्वाचा उल्लेख केला. अहिल्यादेवींनी प्रजाहिताला सर्वोच्च स्थान देऊन मंदिरे, घाट, विहिरी आणि धर्मशाळा उभारल्या. त्यांचा आदर्श राज्यकारभार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन शुभम ढवळे यांनी, तर आभार यशवंत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोहित सुरजुसे, नत्थू तातोडे, सचिन कोचे आणि जगन्नाथ बंजारा यांनी सहकार्य केले.

प्रतिनिधी मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | सावनेर, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *