नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार मा. श्री. विकास बिक्कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तहसीलदार विकास बिक्कड यांच्या हस्ते तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवडीसोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास नायब तहसीलदार संदीप तडसे, ज्योती जाधव, संजयकुमार कांबळे, दुय्यम निबंधक, तालुका कृषी अधिकारी, अन्न पुरवठा अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक, कृषी सहाय्यक तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहण आणि वृक्षारोपणामुळे तहसील कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वातंत्र्यदिन सोहळा आनंदात साजरा केला.

प्रतिनिधी मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *