• बावी येथे भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन
  • अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात
  • ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
  • दररोज भजन, हरिपाठ आणि कीर्तन सेवा
  • विविध महाराजांची कीर्तन सेवा होणार
  • २८ ऑगस्टला काल्याच्या कीर्तनाने सांगता

AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील मौजे बावी येथे आजपासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवार, २१ ऑगस्ट ते शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील गौरवशाली परंपरेचे स्मरणीय ह.भ.प. बलभीम महाराज बावीकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह.भ.प. अंकुश महाराज पवार यांच्या आशीर्वादाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी काकडा, भजन, दुपारी गाथा भजन, राम कृष्ण हरी जप, हरिपाठ आणि त्यानंतर कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यासपीठ चालक ह.भ.प. हनुमंत निकम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे.

कार्यक्रमात ह.भ.प. बाबासाहेब महाराज दळवी भाळवणीकर, ह.भ.प. भाग्यवान महाराज रोडगे, ह.भ.प. विकास महाराज वायसे, ह.भ.प. प्रदीप महाराज जाधव, ह.भ.प. परमेश्वर महाराज खोसे, ह.भ.प. धर्मराज दादा सामनगावकर आणि ह.भ.प. शरद महाराज लेकुरवाळे यांची कीर्तन सेवा होणार आहे.

शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी ह.भ.प. गोरक्षनाथ झांबरे, संगमेश्वर संस्थान यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हरिकीर्तनानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धनाथ तरुण मंडळ, बावी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील विविध मंडळे, भजनी मंडळे, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

एनटीव्ही न्यूज मराठी | जामखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *