यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून ऋणानुबंधनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे होत्या. यावेळी पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे आणि गौरी भिरूड उपस्थित होत्या. अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यालयात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सुजाता पाटील आणि प्राजक्ता वाणी यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भारंबे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
