जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू आणि जिल्हा परिषद पीएम श्री मराठी शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या विशेष संकल्पनेतून शाळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात लोकप्रतिनिधी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

या मोहिमेत दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच देविदास पाटील, दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन, उपाध्यक्ष आशाताई सूर्यवंशी, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले.

अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे मान्यवर आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे शाळा व शाळेच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.

या उपक्रमातून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ हा संदेश देण्यात आला. शाळा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *