गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील गणपती कारागिरांची लगबग वाढली आहे. शाडू माती आणि पीओपीच्या आकर्षक गणेशमूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवला जात आहे. विशेष म्हणजे, सिन्नरच्या गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि थेट दुबईतूनही मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे.

सिन्नरमधील कारागीर सध्या गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. शाडू माती आणि पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक गणेशमूर्तींना यंदा चांगली मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

यंदा गणेशमूर्तींच्या मागणीत सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती कारागिरांनी दिली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी सिन्नरच्या गणेशमूर्ती पाठवल्या जात आहेत.

विशेष म्हणजे, सिन्नरच्या कारागिरांच्या कलेची ओळख आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट परदेशातही पोहोचली आहे. यंदा थेट दुबईमध्येही सिन्नरच्या गणेशमूर्ती रवाना होत आहेत.

यामुळे सिन्नरच्या गणेशमूर्तींच्या कलेला परदेशातही मागणी मिळत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *