• बँक ऑफ इंडियाचा १२१ वा स्थापना दिन
  • व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांचा विशेष सन्मान
  • लोकहिताच्या बातम्यांना पत्रकारांची प्राधान्य
  • पत्रकारिता समाज-प्रशासनातील महत्त्वाचा दुवा
  • सकारात्मक पत्रकारितेच्या कार्याचे कौतुक
  • पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल

SINDHUDURG | बँक ऑफ इंडिया, दोडामार्ग शाखेच्या १२१ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक आणि लोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया दोडामार्गच्या पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी शाखा व्यवस्थापक पवन नयन कुलकर्णी यांनी दोडामार्ग तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम पत्रकारांकडून केले जात असल्याचे नमूद केले. तालुक्यातील चांगल्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पत्रकारिता ही समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, स्थानिक प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या सन्मान सोहळ्यास व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बुधाजी (आपा) राणे, सचिव सुमित दळवी, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गवस, गोविंद शिरसाट, शुभम गवस, नारायण नाईक, शिरीष नाईक आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम शाखा व्यवस्थापक पवन नयन कुलकर्णी व विशेष सहाय्यक शुभम दीपक गावडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी नंदकिशोर तसेच इफ्तिखार पटेल यांचीही उपस्थिती होती.
बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त पत्रकारांचा करण्यात आलेला हा सन्मान पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेणारा आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरला

एनटीव्ही न्यूज मराठी | दोडामार्ग, सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *