यावल येथील कृषी विभागातील शिपाई हैदर हबीब तडवी, वय ५२, यांचे ९ सप्टेंबर रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने कृषी विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हैदर तडवी यांनी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयात आपली सेवा बजावली. कार्यालय बंद करून घरी गेल्यानंतर सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. डॉक्टर तुषार सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले.

हैदर तडवी हे कळमोडे येथील रहिवासी असून यावल येथील तडवी कॉलनीमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि जावई असा परिवार आहे. ते समीर तडवी यांचे वडील होते. रावेर येथे त्यांचे पाच भाऊ आहेत.

कृषी अधिकारी भरत वारे यांच्या निधनानंतर आठवड्यात कृषी विभागात ही दुसरी दुःखद घटना घडली आहे. त्यामुळे कृषी विभागात हळहळ व्यक्त होत आहे. हैदर तडवी यांच्यावर आज सायंकाळी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *