रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील SIR प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्त्वाची आढावा बैठक भालोद येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

आगामी SIR प्रक्रियेच्या अनुषंगाने मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

डॉ. किरीट सोमय्या यांनी रावेर विधानसभा क्षेत्र तसेच जळगाव पूर्व जिल्ह्याच्या SIR कार्यक्रमातील कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पुढील आवश्यक नियोजनासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी विधानपरिषदेचे आमदार नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन, भाजप जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अण्णा बाविस्कर, केतकी पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, माजी सभापती हर्षल पाटील, भाजप किसान मोर्चाचे पूर्व क्षेत्र जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील आणि रावेर विधानसभा क्षेत्र BLA-1 विलास चौधरी यांच्यासह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *