हिंदू देवी-देवतांचा आणि गणेशोत्सवाचा अवमान केल्याचा आरोप करत हिंदू सेवा संघाने विद्यानंद बापट यांच्यावर गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे. हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत बापट यांना पुण्यातून हद्दपार करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

तसेच हिंदू भाविक, गणेश मंडळे आणि वारकरी संप्रदायाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करत पुढील ४८ तासांत माफी मागण्याचा अल्टिमेटमही देण्यात आला आहे.

गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याने पार पडावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदू सेवा संघाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *