यावल तालुक्यातील मुदत संपलेल्या ४६ ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
प्रशासकीय अडचणी आणि निवडणुका वेळेत न झाल्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार विस्कळीत होऊ नये, यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रशासकांची नियुक्ती ८ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाली असून, नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत किंवा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ती वैध राहणार आहे.
प्रशासकांकडे सरपंचांचे सर्व अधिकार व कर्तव्ये देण्यात आली आहेत. ग्रामपंचायतींचे प्रलंबित लेखापरीक्षण पूर्ण करणे, कर वसुली १०० टक्के करण्यासाठी उपाययोजना करणे आणि कोणत्याही परिस्थितीत कर वसुली ७० टक्क्यांपेक्षा कमी राहू न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वउत्पन्नातून पाणीपुरवठा, आरोग्य, दिवाबत्ती आणि वेतन यांसारख्या अत्यावश्यक बाबींवरच खर्च करण्याचे निर्देश आहेत. तसेच पाणीपुरवठ्याचे वीज बिल, ५ टक्के दिव्यांग खर्च, १० टक्के महिला-बाल कल्याण खर्च आणि २० टक्के मागासवर्गीय खर्चाला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.
४६ ग्रामपंचायती व प्रशासक :
आडगाव — एस.बी. भदाणे
आमोदे — एस.बी. भदाणे
अंजाळे — ई.के. चौधरी
अट्रावल — आरती इंगळे
बामणोद — के.सी. सपकाळे
भालोद — के.सी. सपकाळे
भालशिव — ई.के. चौधरी
बोरावल खुर्द — डी.व्ही. निळे
बोरखेडा बु. — के.सी. सपकाळे
चिंचोली — एस.बी. भदाणे
दहिगाव — सरोज पाटील
डांभुर्णी — रमेश विसावळे
डोणगाव — शोभा रमेश पाटील
डॉ. कठोरा — गणेश डाकुर
दुसखेडा — जी.टी. सोनवणे
हंबरडी — जी.टी. सोनवणे
हिंगोणे — गणेश डाकुर
कासवे — ई.के. चौधरी
किनगाव बु. — रमेश विसावळे
कोळवद — अर्चना राजेंद्र आटोळे
कोरपावली — महम्मद हबीब तडवी
कोसगाव — ई.के. चौधरी
महेलखेडी — महम्मद हबीब तडवी
मनवेल — अनिल वसंत सुरडकर
मारूळ — के.सी. सपकाळे
मोहराळे — विजय रंगनाथ ठाकूर
नावरे — विजय रंगनाथ ठाकूर
नायगाव — के.सी. सपकाळे
निमगाव — जया रणधीर नाईक
पिळोदे खुर्द — कविता किरण गोहिल
पिंप्री — सरोज पाटील
पिंपरुड — एन.पी. वैराळ
राजोरा — जी.टी. सोनवणे
सांगवी बु. — एन.पी. वैराळकर
सांगवी खुर्द — जी.टी. सोनवणे
सातोद — अर्चना राजेंद्र आटोळे
सावखेडेसिम — ई.के. चौधरी
शिरसाड — शेख इम्तियाज रियाज
टाकरखेडा — गणेश डाकुरे
उंटावद — एस.बी. भदाणे
वढोदे प्र. सावदा — पी. वैराळकर
वढोदे प्र. यावल — रमेश विसावळे
वड्री — कल्पना पितांबर तायडे
वनोली — एन.पी. वैराळकर
विरावली — रमेश विसावळे
विरोदा — एन.पी. वैराळकर
