यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी सायमा हरून पटेल हिने स्पेलिंग बी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सायमाच्या या यशाबद्दल शाळेत तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुख विजयकुमार ठाकूर, मुख्याध्यापक कुतुबुद्दीन सर, नगमा मॅडम, मजेत सर, सुलेमान सर तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जफर खान पठाण आणि उपाध्यक्ष हरून पटेल यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील उर्दू शाळेतील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता सायमा जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *