यावल तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या अट्रावल येथील मुंजोबा मंदिराच्या विविध विकासकामांसाठी २ कोटी ३१ लाख ८९ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

अट्रावल येथील मुंजोबा देवस्थानच्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याबद्दल अट्रावल, भालोद आणि चितोडा परिसरातील भाविक व ग्रामस्थांकडून आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अट्रावल यात्रेच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागते. यात्रोत्सवाच्या काळात होणारी गर्दी आणि भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी शासनाकडून हा निधी मंजूर करून घेतला आहे.

या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे लवकरच या तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हाभरातून भाविक या ठिकाणी येतील आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

यामुळे यावल-रावेर तालुक्यातील मुंजोबा भक्तांकडून आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *