लोअर परळ स्टेशनच्या बाजूला आणि करी रोड परिसरातील ‘बालसाथी मित्र मंडळा’ने यंदा पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. ६३ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने कागदाचा वापर करून १४ फुटांची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली आहे.

या गणेशमूर्तीसाठी सुमारे १४ ते २० किलो कागदाचा वापर करण्यात आला असून, तब्बल दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही मूर्ती साकारण्यात आली आहे.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मूर्ती कोणत्याही बाहेरील मूर्तीकाराकडून बनवून घेण्यात आलेली नाही. मंडळातील तरुणांनी एकत्र येऊन ही मूर्ती साकारली आहे.

यामध्ये शाळेत जाणारी मुले-मुली, कॉलेजचे तरुण आणि कार्यालयात काम करणारे नोकरदार यांनी एकत्र येत विविध कल्पना मांडल्या आणि हा अनोखा बाप्पा साकारला.

कागदाचा पुनर्वापर कसा करता येतो आणि तो पर्यावरणासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो, हे या उपक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *