यावल शहरासह तालुक्यात आज सहा गावांमध्ये पाच दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जन होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुमारे ३०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

यावल शहरासह नायगाव, डांभुर्णी, कोरपावली, महेलखेडी आणि मोहराळा या गावांमध्ये सायंकाळी गणेश विसर्जन होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यामध्ये २५४ होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी तसेच नाशिक, ठाणे, एसआरपी आणि आरसीपीचे कर्मचारी मिळून एकूण ३०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

फैजपूरचे विभागीय पोलीस अधिकारी बडगुजर आणि यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यानंतर ७, ९ आणि ११ या दिवशी तालुक्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *