दहिगाव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांची जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र प्रमुख गांगुर्डे यांनी पत्राद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडे सहा तालुक्यांचा पदभार देण्यात आला आहे.
हरिभाऊ विजय पाटील यांच्याकडे यावल, भुसावळ, बोदवड, जामनेर, रावेर आणि चोपडा या तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दहिगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने यावल पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी सौ. सरोज पाटील यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक प्रताप बोदडे उपस्थित होते. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष पूर्व श्री. हरिभाऊ रत्नाबाई विजय पाटील, डिंगबर रघुनाथ पाटील, जितेंद्र शालिक वाघ, शेतकरी चंद्रकांत गोकूळ पाटील आणि दिलीप बाबूराव पाटील यांच्या वतीने सरोज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
