जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डोणगाव-किनगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता आठवीतील दुर्वेश दिगंबर पाटील आणि इयत्ता सातवीतील यतीश दीपक कुंभार यांनी ही कामगिरी केली आहे.
सध्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव या शाळेतील १४, १७ आणि १९ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत दुर्वेश दिगंबर पाटील आणि यतीश दीपक कुंभार यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन व श्रीसंत तुकाराम महाराज सेवाभावी संस्था, पंढरपूरचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, सचिव व संजीवन हॉस्पिटल डेक्कन, पुणेचे संचालक मनीष पाटील, स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका पूनम पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
