यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून यंदाचा गणेशोत्सव अत्यंत पर्यावरणपूरक आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
शाळेच्या सहशिक्षिका श्रद्धा बडगुजर यांनी शाडू मातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली. शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन व दिपाली धांडे यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात बाप्पाची स्थापना करण्यात आली.
तसेच शाळेतील इयत्ता ५वी, ६वी व ७वीच्या विद्यार्थ्यांमार्फत श्री गणेशाची प्रतिकृती तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठणही करण्यात आले.
श्री गणेशोत्सवाची तयारी शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
शाळेच्या उत्साहपूर्ण वातावरणात वाजतगाजत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
