महालक्ष्मी उत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा नसरीन बागवान यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि सणाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

केज येथे दि. १७ सप्टेंबर रोजी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा नसरीन बागवान यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी जाऊन महालक्ष्मी सणानिमित्त सदिच्छा भेट घेतली.

पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात साजरी होणाऱ्या महालक्ष्मी उत्सवानिमित्त ही सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दर्शन सोहळ्याचा आनंद घेतला.

याप्रसंगी सौ. सारिकाताई सोनवणे व युवा नेते सौरव सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान महालक्ष्मी सणाच्या आणि उत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली.

या सदिच्छा भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जब्बार शेख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *