केज शहरात शिवसेना आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा गरजू आणि वयोवृद्ध नागरिकांनी लाभ घेतला असून, जवळपास 80 वयोवृद्धांना आयुष्मान कार्ड काढून देण्यात आले.
केज येथे शिवसेनेच्या वतीने मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर घेण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार तथा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद भैया खान यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मदत करून अनेक रुग्णांना जीवदान मिळाले असून, पाथरी, परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना सहकार्य करणारे लोकनेते सईद भैया खान यांच्या कार्यपद्धतीचा बीड जिल्ह्यातही राबविण्यात येणार असल्याचे सय्यद माजेद यांनी सांगितले.
केज शिवसेना व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने, केज शहरातील ज्या गरजू वयोवृद्ध लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळाले नाही, अशा नागरिकांना शिवसेना व अल्पसंख्याक विभागाचे तालुकाप्रमुख सय्यद माजेद हमीद यांच्या नियोजनाखाली मोफत कार्ड काढून देण्यात आले. या शिबिरात जवळपास 80 वयोवृद्ध लोकांनी लाभ घेतला.
तसेच या सामाजिक कार्यासाठी बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळूक, उपनेत्या सौ. संगीताताई ठोंबरे, महिला जिल्हाप्रमुख सौ. प्रतिभाताई थोरात, विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
