उमरखेड नगरपरिषदेअंतर्गत ‘माझी वसुंधरा अभियान’च्या ब्रँड ॲम्बेसीडरपदी डॉ. श्री. जयशंकर जवने आणि श्री. जमिरोद्दीन खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण आणि जलसंवर्धनातील त्यांच्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली.

उमरखेड शहर व परिसरात दोघांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन तसेच जलसंवर्धनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्री. अजय कुरवाडे यांनी त्यांची ब्रँड ॲम्बेसीडरपदी नियुक्ती केली.

‘माझी वसुंधरा अभियान’च्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, हरित क्षेत्र वाढविणे, पाणी बचत, स्वच्छता आणि पर्यावरण जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. उमरखेडमध्ये अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी दोन्ही ब्रँड ॲम्बेसीडरच्या सामाजिक सहभागाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

या नियुक्तीचे श्रेय मुख्याधिकारी डॉ. श्री. अजय कुरवाडे तसेच ॲड. प्रा. श्री. विजय गुजर यांना जाते, असे डॉ. जयशंकर जवने आणि श्री. जमिरोद्दीन खतीब यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *