केजमध्ये राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या भव्य ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे उद्घाटन आणि महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

या सोहळ्यास अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर, केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, गटनेते हारूनभाई इनामदार, दिलीपराव गुळभिले, रणजितदादा आडसकर, अरुण बप्पा धपाटे, युवक केज तालुका अध्यक्ष शिवदास थळकरी, गजमफर इनामदार, नगरसेवक सुग्रीव भाऊ कराड, राजू इनामदार, खैसर इनामदार, सुशील भैया अंधारे, अजय काळे, सुनील बापू देशमुख, योगेश शिंदे, सुधीर शिंदे, बाळासाहेब नांदे, सुहास गुजर, शिवाजी हजारे, सय्यद शकील, मिनाज पठाण आणि योगेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या शुभहस्ते ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत महाआरती पार पडली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *