जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील हरिभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल बोदवड तालुका अपंग संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोदवड तालुक्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.
यावेळी बोदवड तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार, उपाध्यक्ष बाळू पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे, प्रहार सेवक अशोक तायडे, सचिन भाऊ उगले, आबासाहेब देशमुख, सल्लागार प्रल्हाद बेद्रे, सचिव डॉक्टर पारसमल, उपसचिव बजरंग बैरागी, महिला उपाध्यक्ष मनिषाताई गोंधळी, महिला उपसचिव मायाताई गवळी, खुशबू शर्मा, योगेश महाराज आणि गजानन गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
