यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात संस्थापक अध्यक्ष कै. वासुदेव राजाराम वाणी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये क्रीडा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला आणि रंगभरण स्पर्धांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी. एस. सोनवणे यांनी शाळेला व्यासपीठ (डेक्स) सप्रेम भेट दिले. मान्यवरांच्या हस्ते त्याचे शाळेला प्रत्यार्पण करण्यात आले.

कै. वाणी सरांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त ‘सुंदरशाळा, स्वच्छ शाळा’ आणि ‘प्लॅस्टीक पिशव्यामुक्त शाळा’ असा संकल्प घेण्यात आला.

सर्व स्पर्धांतील विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी, प्रमुख पाहुणे वसंतराव सिताराम पाटील आणि पी. एस. सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पाहुण्यांनी आपल्या भाषणातून कै. व्हि. आर. वाणी सरांच्या महान कार्याला उजाळा देत विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल देशमुख यांनी केले, तर आभार नितीन बारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सुनिल माळी, मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *