यावल तालुक्यातील साकळी येथील 26 वर्षीय विनोद जीवन बडगुजर ऊर्फ सोन्या याचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. आज 22 सप्टेंबर रोजी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
साकळी येथील विनोद जीवन बडगुजर, वय 26, या अविवाहित तरुणाने आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. वेळ नक्की समजलेली नाही.
हा प्रकार निदर्शनास येताच आप्त मंडळींनी त्याला त्वरित यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
याबाबत त्याचे वडील जीवन बडगुजर यांनी यावल पोलिसांत खबर दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे व सहकारी पुढील तपास करीत आहेत.
