माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्कूलचे चेअरमन व्ही. डी. पाटील यांच्या निवासस्थानीही भेट दिली.

किनगाव-डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन व्ही. डी. पाटील हे अन्न आणि औषधे प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पदावर सेवेत असताना त्यांचे एकनाथराव खडसे यांच्याशी पारिवारिक व मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

दिनांक 22 रोजी एकनाथ खडसे यांनी व्ही. डी. पाटील यांच्या इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलला भेट देत त्यांच्या निवासस्थानीही भेट दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणीताई खडसे, इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्ष सौ. शैलेजाताई विजयकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती रविंद्र पाटील, डॉ. विजय बोरसे आणि गिरडगावचे पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *