यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चोपडा बीटमधील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या सांघिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी अनुदानित आश्रमशाळा, मनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या स्पर्धांमध्ये चोपडा बीटमधील १३ आश्रमशाळांतील तब्बल ५७० आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मनवेल आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील होते. सहायक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी तथा चोपडा बीट प्रमुख राजेंद्र मुसळे, मनवेल आश्रमशाळा संस्थेचे उपाध्यक्ष भगवान देशमुख, सचिव मिराताई पाटील, सहसचिव यादवराव पाटील, भुवनेश्वरी विद्यालय, मनवेलचे माध्यमिक मुख्याध्यापक अरुण पाटील यांच्यासह चोपडा बीटमधील विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व आदिवासी खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुदानित आश्रमशाळा, मनवेल येथे पहिल्या दिवशी १४ वर्षांखालील मुलांच्या तसेच १४, १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल व हॅण्डबॉल या सांघिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. चोपडा बीटमधील १३ आश्रमशाळांतील तब्बल ५७० आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चोपडा बीट प्रमुख राजेंद्र मुसळे, विविध क्रीडा समित्यांचे प्रमुख व सदस्य, मनवेल आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे, माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्यासह मनवेल आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

तसेच बीट समन्वयक ज्ञानेश्वर महाजन (देवझिरी), सतीश पाटील (हातेड), चोपडा बीटमधील विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक, क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक, शिक्षक-शिक्षिका व वर्ग चार कर्मचारी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *