जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, पीक विम्यातील तफावत दूर करा आणि कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करा, अशा विविध मागण्या आमदार अमोल जावळे यांनी मांडल्या. नाशिक येथे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.

सन २०२५-२६ मधील नुकसानग्रस्त पिकांच्या विम्याबाबत निर्माण झालेली तफावत दूर करून पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली.

कृषी पंपांचे वीज लोडशेडिंग कमी करून शेतकऱ्यांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी मांडली. साडेसात हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही वीज बिलमाफीचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केली.

पावसातील खंड आणि निर्माण झालेल्या पीक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणीही आमदार जावळे यांनी शासनासमोर मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *