यावल तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय जनता पार्टी एसआयआर समितीतर्फे शनिवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत एसआयआर नोंदणी कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पला मतदारांनी प्रतिसाद दिला असून, एकूण ७० मतदारांनी नोंदणी केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

नायगाव येथील मतदारांनी आपापल्या बूथवर शासकीय बीएलओ किशोर पाटील, भरत सिरसाठ, रामदास मगरे आणि प्रताप पावरा यांच्याकडे नोंदणी केली.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, बूथ क्रमांक १७८ वर फॉर्म क्रमांक ६ चे १२ आणि फॉर्म क्रमांक ८ चे ७ अर्ज, बूथ क्रमांक १७९ वर अनुक्रमे ११ आणि ६ अर्ज, बूथ क्रमांक १८० वर ९ आणि ६ अर्ज, तर बूथ क्रमांक १८१ वर ९ आणि १० अर्ज भरण्यात आले.

उर्वरित तीन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याने नोटीस प्राप्त मतदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन भाजपा एसआयआर समिती सदस्य अरुण पाटील नायगावकर आणि सहकाऱ्यांनी केले.

यावेळी भाजपा बीएलओ भगवान कुंभार, हिम्मत पाटील, अरुण पाटील तसेच युवा सदस्य चिटणीस सारंग कोळी, नंदादीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *