यावल तालुक्यातील दुसखेडा येथील पाड्यावर विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७ सप्टेंबर रोजी आयोजित या मोहिमेत नागरिकांना आवश्यक दाखले आणि विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला.
विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच VJNT प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
यावेळी नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यासह विविध आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यात आले. तसेच रेशन कार्ड आणि संजय गांधी योजनेच्या लाभाचेही वितरण करण्यात आले.
या विशेष अभियानावेळी यावलचे तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, बामणोदचे मंडळ अधिकारी, दुसखेडा येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
