यावल येथे रविवारी, दि. 27 रोजी यावल तालुका काँग्रेस कमिटी, यावल शहर काँग्रेस कमिटी आणि फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने ‘तालुका कार्यकर्ता संवाद बैठक’ पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी आमदार रमेशदादा चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर-यावल मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी उपस्थित होते. बैठकीची प्रास्ताविक भूमिका यावल तालुकाध्यक्ष प्रशांत भगवान पाटील यांनी मांडली.

बैठकीत बूथ स्तरापर्यंत संघटना अधिक मजबूत करणे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे तसेच गावागावातील नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या विचारधारेसाठी आणि चिन्हासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या संवाद बैठकीदरम्यान विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी, जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी, विलासशेट तायडे, यावल शहराध्यक्ष हकीम शेट, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई, महिला तालुकाध्यक्ष कल्पना ताई तायडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल कोळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आणि तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासह जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *