यावल तालुक्यातील किनगाव येथील श्रीराम मंदिरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे नाव नोंदणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जळगाव जिल्हा पूर्व संघटनेचे सचिव सुभाष पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
शिबिराच्या सुरुवातीला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पाटील, डीवायएसपी प्रमोद साळुंखे आणि प्रदीप साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना एसआयबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच सदस्य नाव नोंदणीसह 41 दिव्यांगांचे अर्ज भरण्यात आले.
कार्यक्रमात विष्णू पाटील, अरुण ठाकूर, गजानन सोनवणे, प्रतीक पाटील, ललित पाटील, सुपडू कोळी, नंदू समाधान पाटील, महिला आघाडीच्या यावल तालुका शहराध्यक्ष मिनाताई जनार्दन यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र गिते, योगिता पाटील, मंगला बोरसे, पूनम पाटील यांच्यासह किनगावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विष्णू महाराज यांनी आभार मानले.
