जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या ६४ वर्षीय दगडू ओंकार पाटील यांचे यमुनोत्री येथे दर्शन घेऊन परतत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी हरिद्वार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

किनगाव बुद्रुक येथील दगडू ओंकार पाटील हे पत्नी विठाबाई पाटील आणि गावातील सुमारे २२ भाविकांसोबत २४ सप्टेंबर रोजी चारधाम यात्रेसाठी निघाले होते. २६ सप्टेंबरला पथक हरिद्वार येथे पोहोचले. विविध ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी ते यमुनोत्री येथे गेले होते.

दर्शनानंतर परतीच्या प्रवासात दगडू पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकारी भाविकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबाच्या निर्णयानुसार त्यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हरिद्वार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचा मोठा मुलगा किरण पाटील नेदरलँडहून लंडनमार्गे दिल्ली येथे दाखल झाला असून पत्नी आणि दोन मुलांसह हरिद्वारला पोहोचणार आहे. लहान मुलगा चेतन पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात प्रशासकीय अधिकारी असून तेही कुटुंबासह हरिद्वारला रवाना झाले आहेत.

दगडू पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *