♦️ मौजा पोही शेती प्रकरणाची तक्रार
♦️ कैलास साठवणेंनी समितीकडे मागितला न्याय
♦️ ज्वालाताई धोटेंनी तक्रारीची घेतली दखल
♦️ कागदपत्रे, न्यायालयीन आदेशांची होणार तपासणी
♦️ शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची घेतली भूमिका
♦️ महसूल प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष
NAGPUR | नागपूरच्या मौजा पोही येथील वडिलोपार्जित शेतीच्या प्रकरणात न्यायालयीन आदेशाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून झालेल्या कार्यवाहीबाबत शेतकरी पुत्र कैलास महादेव साठवणे यांनी अन्याय निवारण समितीकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची समितीच्या अध्यक्षा ज्वालाताई जामवंतराव धोटे यांनी दखल घेत पुढाकार घेतला आहे.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या ज्वालाताई धोटे यांनी संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करून तक्रारदाराला न्याय मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे.
“शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर अन्याय निवारण समिती गप्प बसणार नाही. प्रकरणातील कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि महसूल अभिलेख तपासून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी भूमिका ज्वालाताई धोटे यांनी घेतल्याचे तक्रारदाराने सांगितले.
ज्वालाताईंच्या पुढाकारामुळे या प्रकरणाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. आता संबंधित महसूल प्रशासनाकडून या तक्रारीवर काय कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
#️⃣ Hashtags:
#Nagpur #NagpurNews #Jwa
