♦️ महिला काँग्रेसचा जनता दरबार आयोजित
♦️ शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
♦️ योजनेतील अडचणी महिलांनी केल्या मांडल्या
♦️ अर्ज प्रक्रियेतील समस्यांवर झाले मार्गदर्शन
♦️ महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले
♦️ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

YAVATMAL | उमरखेड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासंदर्भातील अडचणी मांडण्यासाठी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला. योजनेतून नावे कमी झाल्याचा दावा करणाऱ्या तसेच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांनी या जनता दरबाराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

स्थानिक काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबाराला यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना आवारी, उपाध्यक्ष नीलिमा काळे आणि जिल्हा सचिव पूजा धुळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
उमरखेड शहर आणि तालुक्यातील महिलांनी योजनेसंदर्भातील अडचणी, अर्जाची रखडलेली प्रक्रिया, कागदपत्रांमधील तांत्रिक समस्या तसेच पात्र असूनही नावे कमी झाल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. यावर महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत या समस्या प्रशासनाकडून सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महिलांकडून अर्जही भरून घेण्यात आले.
हा उपक्रम तालुकाध्यक्षा मनीषा कऱ्हाळे आणि महिला शहर अध्यक्षा सागर शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. नगरसेविका राधा इंगोले आणि नंदा दवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार सुनीता शहाणे यांनी केले. जनता दरबाराचे नियोजन काँग्रेस नेते गोपाल अग्रवाल आणि गजानन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

एनटीव्ही न्यूज मराठी | उमरखेड, यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *