अखिलस्तरीय महा-ई-सेवा केंद्राचे जिल्हा कार्याध्यक्ष शेख नदीम मगदूम आणि त्यांच्या मातोश्री गौसीयाबेगम शेख मगदुम हे पहिल्यांदाच पवित्र उमरा यात्रेसाठी रवाना होणार आहेत. यानिमित्त कंधार येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दोघांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

शेख नदीम मगदूम आणि त्यांच्या मातोश्री गौसीयाबेगम शेख मगदुम हे सोमवारी, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पवित्र उमरा यात्रेसाठी रवाना होणार आहेत. रमाईनगर, कंधार येथे शनिवारी, दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दोघांचा सत्कार केला.

उमरा ही इस्लाम धर्मातील पवित्र यात्रा असून तिला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविक मक्का येथील काबा शरीफचे दर्शन, तवाफ, तसेच सफा आणि मरवाची सई यांसह इतर पवित्र स्थळांना भेट देतात. अनेक भाविक मदीना शहरात जाऊन मस्जिद-ए-नबवीमध्ये नमाज पढतात. उमरा यात्रा वर्षातून कधीही करता येते.

यावेळी तहसीलदार विजय चव्हाण, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नगरसेवक समीर चाऊस, नगरसेवक प्रतिनिधी रामभाऊ बनसोडे, शेख मझर सेठ, शेख आसेफ, दिलीप बसवंते, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, पोलीस निरीक्षक सय्यद इकबाल, शासकीय गुत्तेदार सुनिल सादलापुरे, शासकीय गुत्तेदार महेश मंगनाळे, नवरंगपुरा गावचे सरपंच शंकर बामनवाड, डॉ. प्रकाश सादलापुरे, पर्यवेक्षक मौलाना पठाण, शेख शेरुभाई, प्रा. सुभाष वाघमारे, स्वच्छतादूत राजेश्‍वर कांबळे, हाजी गुलाम हैदर, विनोद तोरणे, तानाजी बसवंते, शेख खौसर, मोहम्मद रशीद, सय्यद फरीदोद्दीन, गुलाम नबी, शेख मुजाहीद, अजय गाजरे यांच्यासह मित्रपरिवार, नातेवाईक, पत्रकार बांधव, इतर क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शेख नदीम आणि गौसीयाबेगम शेख यांचा सत्कार करून उमरा यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेख शादुल | एनटीव्ही न्यूज मराठी | कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *