अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात १५ वर्षीय निहारिका अनिल कोळी हिचा झालेला संशयास्पद मृत्यू अत्यंत दुःखद असून, या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी जमात, यावल तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
मंगळवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता यावल येथील शेतकी संघ येथे समाजबांधवांची बैठक पार पडली. निहारिका कोळी मृत्यू प्रकरणी तहसीलदार, यावल यांना निवेदन देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच २६ ऑक्टोबर रोजी वाल्मिकी जयंती निमित्ताने चर्चा करण्यात आली. जयंती उत्सवासाठी अध्यक्ष व कार्यकारणी जाहीर करणे, कार्यक्रमाचे नियोजन करणे आणि विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
याशिवाय समाजातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. निहारिका कोळी हिच्या मृत्यू प्रकरणी न्यायासाठी समाजबांधवांनी एकजुटीने उपस्थित राहावे आणि निवेदनानंतरही बैठकीसाठी थांबून समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“निहारिकासाठी आवाज उठवूया, महर्षी वाल्मीकी जयंती एकजुटीने साजरी करूया आणि समाजाच्या प्रश्नांसाठी संघटित होऊया,” असे आवाहन आदिवासी टोकरे कोळी जमात, यावल तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
