यावल येथील श्री व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या दिपाली धांडे होत्या. प्रमुख पाहुणे के. यू. पाटील सर, शारीरिक व क्रीडा शिक्षक तसेच यावल संघाचे अध्यक्ष आणि यावल तालुक्याचे क्रीडा समन्वयक दिलीप संगेले सर यांच्यासह सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या दिपाली धांडे यांनी केले. क्रीडा खेळाबाबत माहिती राजश्री लोखंडे यांनी दिली, तर के. यू. पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. या क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांचा समावेश होता. स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन यांनीही उपस्थिती दिली. प्रियंका सुरवाडे व आकाश सुरवाडे या शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी भिरूड मॅम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरोज येवले यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील सर्व सदस्य, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारे हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *