♦️ बाबा नगरसह शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास
♦️ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
♦️ कुत्रे पकडून निर्बीजीकरणाची मागणी
♦️ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

JALGAON | यावल शहरातील बाबा नगरसह विविध भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने आदिल यांनी मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

यावल शहरातील रस्ते, गल्ल्या, बाजार परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिकांसह दुचाकीस्वारांना त्रास होत असून कुत्र्यांच्या चाव्याची आणि अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे तसेच संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास नागरिक आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

प्रतिनिधी | एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *