♦️ शेळगाव बॅरेजमध्ये १००% पाणीसाठ्याचे नियोजन
♦️ आमदार अमोल जावळेंच्या पत्राची प्रशासनाकडून दखल
♦️ जलाशयाची पाणीपातळी १७७ मीटरवर
♦️ शेतकऱ्यांना सिंचनासह भूजल पुनर्भरणाचा लाभ
JALGAON | यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज यंदा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. आमदार अमोल जावळे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र देऊन १०० टक्के पाणीसाठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर संबंधित विभागाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे.
मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे शेळगाव बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे उपसा सिंचनासह भूजलपातळीवरही परिणाम झाला होता.
सध्या बॅरेज जलाशयाची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून आगामी काळात आणखी एक ते दोन मीटर वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास तापी नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधार मिळण्यासोबतच भूजल पुनर्भरणालाही मदत होणार आहे.
