♦️ अकलूद शेतशिवारात महिलेवर मारहाण

♦️ सोयाबीन सर्वेवरून झाला वाद

♦️ शिवीगाळ करून दिली धमकी

♦️ फैजपूर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा

♦️ मिनाबाई कोळी यांनी दिली फिर्याद

♦️ पोलिसांकडून पुढील तपास सुरू

JALGAON | यावल तालुक्यातील अकलूद गावाच्या शेतशिवारात सोयाबीन पिकाचा सर्वे करण्यावरून एका ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकलूद गावाच्या शेतशिवारात राजू पाटील यांच्या शेतात सोयाबीन पिकाचा सर्वे करण्यासाठी तुम्ही का आले, असे सांगत मिनाबाई दिलीप कोळी, वय ४५, यांना यश विनोद सोनवणे आणि अनिता विनोद सोनवणे या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी मिनाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास सोनवणे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

#Yaval #Aklud #Jalgaon #FaizpurPolice #CrimeNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #NTVNewsMarathi #यावल #अकलूद #जळगाव #फैजपूर #मारहाण #गुन्हादाखल #महाराष्ट्रबातम्या #मराठीबातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *