♦️ सेवा पखवाड्यात स्वच्छता अभियान उत्साहात
♦️ विद्यार्थ्यांनी परिसराची केली स्वच्छता
♦️ पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश
♦️ पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती
♦️ सामाजिक जबाबदारीचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश
♦️ उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत

JALGAON | यावल येथील महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ‘सेवा संकल्प अभियान – सेवा पखवाडा’ अंतर्गत स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली.

मेरा युवा भारत जळगाव, महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), यावल आणि नक्षत्र फाउंडेशन, शिरसाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेकजी चावरे, संस्थेचे प्राचार्य पी. बी. पाटील आणि नक्षत्र फाउंडेशन, शिरसाडचे सर्वेसर्वा तेजस धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका समन्वयक राजेश्री पाटील व कोमल इंगळे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम पार पडला.
प्राचार्य पी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. कोमल इंगळे यांनी आभार मानले. स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *