यावल तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथील आश्रमशाळेत वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव संघर्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आज ८ ऑक्टोबर रोजी वनविभागाचे उपवनसंरक्षक, यावल वन विभाग जळगावचे सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी यावल पश्चिमचे वनक्षेत्र अधिकारी पी. डी. जोशी आणि वनपाल वाघझिरा टी. वाय. देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वन्यजीव पृथ्वीच्या समतोलासाठी कसे गरजेचे आहेत, तसेच अवैध शिकार, अवैध वृक्षतोड, अवैध अतिक्रमण आणि वणवा यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कसा निर्माण होतो, याबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला यावल पश्चिमचे कर्मचारी, आश्रमशाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *