यावल तालुक्यातील भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात ‘ऋतुमती अभियान’ अंतर्गत विशेष रक्तगट तपासणी शिबिर पार पडले असून, यादरम्यान ८० विद्यार्थिनींच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात युवती सभा समन्वयक डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला, तर विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आशुतोष वडिकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक आरोग्य केंद्र, भालोदचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भावेश जावळे यांच्या पथकाने ८० विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी केली. या कामात जागृती महाले, के. एस. इंगळे, विक्रांत झोपे, यशोदा रत्न आणि नयना चौधरी यांनी सहकार्य केले. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागील मुख्य हेतू होता. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. मोहिनी तायडे, प्रा. गीतांजली चौधरी, प्रा. भावना प्रजापती, प्रा. जान्हवी परतणे, प्रा. फाल्गुनी राणे, प्रा. मानसी महाजन, प्रा. हंसाली महाजन, प्रा. कोमल सावळे व बालकृष्ण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
