जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील अनिल सुरेश महाजन यांचे वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने दहिगाव परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
अनिल सुरेश महाजन यांचे आज, दिनांक १८ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि काका असा परिवार आहे. ते सुधाकर महाजन यांचे पुतणे, तर सुनील महाजन यांचे भाऊ होत.
त्यांची अंत्ययात्रा आज, दिनांक १८ रोजी सायंकाळी सात वाजता काढण्यात येणार आहे.
