बिलोलीच्या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. डॉ. दिपीका बोंगाळे यांनी एम.डी. पॅथॉलॉजी परीक्षा उत्तीर्ण करत कुटुंबासह बिलोलीचा नावलौकिक वाढवला आहे.

बिलोली येथील सेवानिवृत्त सीआरपीएफ पोलीस उपनिरीक्षक शंकर रामराव बोंगाळे आणि सविता बोंगाळे यांची कन्या डॉ. दिपीका बोंगाळे यांनी मुंबईतील ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे. समूह रुग्णालयाशी संबंधित संस्थेतून एम.डी. पॅथॉलॉजी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.

डॉ. दिपीका यांचे प्राथमिक शिक्षण पूज्य साने गुरुजी विद्यालयात, माध्यमिक शिक्षण आंतरभारती विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर बदनापूर येथून एमबीबीएस पूर्ण करून त्यांनी एम.डी. पदवी संपादन केली.

या यशामागे आई-वडिलांचे प्रोत्साहन, पती डॉ. निखिल डिघे यांची साथ आणि सासू-सासऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. डॉ. निखिल डिघे हे भोकरदन येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. दिपीका यांच्या यशाबद्दल बिलोली परिसरातून अभिनंदन होत असून, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *