यावलच्या कुस्ती क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी कामराज पैलवान यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावल येथील श्रीरामनगर परिसरातील रहिवासी कामराज रूपचंद घरू यांची नुकतीच महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शकील शेख यांनी त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र दिले.

या निवडीबद्दल महाराष्ट्र कुस्ती सेनेचे राज्याध्यक्ष पैलवान संग्राम भाऊ कांबळे, पैलवान भानुदास विसावे, भारत भिका छपरीबंद तसेच रावेर-भुसावळ कुस्ती संघटनेचे अध्यक्ष किशन जावळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

तसेच यावलचे माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, संजय भोई, पत्रकार भरत कोळी, अंजाळे येथील यशवंत पैलवान आणि सुनील चौधरी यांच्यासह यावल येथील यशवंत पैलवान यांनी कामराज घरू यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *