क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली तालुक्यातील पाच गावांमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजप आदिवासी मोर्चाच्या वतीने गावोगावी भेटी देत आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यात आला. यावेळी समाजाच्या विविध समस्या, अपेक्षा आणि सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव, देवापूर, रायपूर, जांभळी आणि चांदाळा येथे भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या वतीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भाजप आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांना भेटी देऊन भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा, त्यांचे क्रांतिकारी विचार आणि समाजासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करण्यासोबतच आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी भाजप आदिवासी मोर्चाचे गडचिरोली तालुकाध्यक्ष लोमेशजी कुळमेथे, रवींद्र सुरपाम, पियुष शेडमाके, सागर हलामी, खुशाल निकुरे तसेच गावातील ज्येष्ठ आदिवासी बांधव उपस्थित होते.
