बटवाडी खुर्द येथे स्वर्गीय सहदेवराव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. साधी राहणी, उच्च विचार, निर्मळ स्वभाव आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

साधी राहणी, उच्च विचार, सरळ वृत्ती आणि निर्मळ स्वभाव… प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आदर्श जीवन जगणारे स्वर्गीय सहदेवराव पाटील यांना बटवाडी खुर्द येथे हजारो लोकांनी अखेरचा निरोप दिला.

गावातील प्रत्येक कार्यात आणि परिसरातील अनेक गावांमध्ये सहदेवराव आवर्जून उपस्थित असायचे. त्यांच्या जीवनातील एखादा गुण जरी आपण आचरणात आणला, तरी तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

मन नदीच्या तीरावर त्यांचे चिरंजीव संतोष यांनी अग्निसंस्कार केले. टाळ-मृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा निघाली. आजूबाजूच्या गावांतील नागरिक, आप्तेष्ट, नातेवाईक आणि सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसभेत उमेशाप्पा भुसारी, पत्रकार रमेशजी ठाकरे आणि ह.भ.प. दाने महाराज यांनी आपल्या मनोगतातून शोकसंवेदना व्यक्त केल्या. गुरुदेव सेवामंडळाच्या वतीने समारोपाचे मनोगत भानुदास कराळे यांनी व्यक्त केले.

यानंतर दोन मिनिटे मौन पाळून सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी पसायदान होऊन जयगुरूच्या जयघोषात कार्यक्रमाचा समारोप झाला.

आता सहदेवराव पाटील यांच्या जीवनप्रवासातील आठवणीच कायम सोबत राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *